गणपती आरती संग्रह 1

गणपती आरती संग्रह. Ganapati Aarti Sangrah.


उंदरावरि बैसोनि दूडदूडा य...

उंदरावरि बैसोनि दूडदूडा येसी। हाती मोद्क लाडू घेउनियां खासी।
भक्तांचे संकटी धावूनि पावसी। दास विनविती तुझियां चरणासी॥१॥
जय देव जय देव जय गणराजा सकळ देवां आधी तूं देव माझा॥ जय देव.॥धृ.॥
भाद्रपदमासी होसी तू भोळा। आरक्त पुष्पांच्या घालूनिया माळा।
कपाळी लावूनी कस्तुरी टीळा। तेणे तू दिससी सुंदर सांवळा॥ जय.॥२॥
प्रदोषाचे दिवशी चंद्र श्रापीला। समयी देवे मोठा आकांत केला।
इंदु येवोनि चरणी लागला। श्रीराम बहुत श्राप दिधला॥ जय.॥३॥
पार्वतीच्या सुता तू ये गणनाथा। नेत्र शिणले तुझी वाट पाहतां॥
किती अंत पाहासी बा विघ्नहर्ता। मला बुद्धी देई तू गणनाथा॥