श्रीगणेशायनम: ॥ श्रीगुरुभ्योनम: ॥ श्री आनंदमूर्ति चरित्र ॥ श्रवणें पावन झालें श्रोत्र ॥
हीन पातक्यांसही पवित्र । करोनि ठेविलें स्वामीनें ॥१॥
पुढें निर्याण प्रकरण । श्रवण करोत विद्वज्जन ॥
जया कथितां साधन । परलोकींचें हों सरे ॥२॥
सांप्रदायिक मंडळीसी । कितेकां लाविलें भक्तीसी ॥
जे कां मुकुक्षु तयांसी । ज्ञानसंपन्न पै केलें ॥३॥
मुक्तीचा जो शेलवाटा । प्राप्त झाला तया सुभटा ॥
नि:सीम गुरुभक्तिचा पेटा । हों सरला निदानीं ॥४॥
दुसरें आचरण याहून अधिक । जया नावडे कांहीं एक ॥
गुरूभक्तीचा पाईक । नि:शेष जो गणियेला ॥५॥
स्वस्तिश्री नृप शालिवाहन । शके सोळाशें अठरा जाण ॥
धाता संवत्सर अभिधान । कार्तिक शुद्ध चतुर्दशी ॥६॥
प्रात:काळीं करोन स्नान । श्रीपादुकांचें पूजन ॥
करिते समयीं ब्राम्हाण । सभा समीप बसलीसे ॥७॥
त्या काळीं एक द्विज वृद्ध । पातला स्वामींचे सन्निध ॥
पंचांगश्रवण सुबुद्ध । स्वामीलागीं करविलें ॥८॥
आणिक बोलिला श्रीमुनीतें । बैकुंठ चतुर्दशी पुण्यतिथी ते ॥
आज पातली असे येथें । परलोक - गमनार्थ सुदिन हा ॥९॥
स्वामी वदले उत्तम असे । अनुमोदन त्या शब्दास ॥
नंतर त्या ब्राम्हाणास । नमस्कार पैं केला ॥१०॥
आज्ञेनुरूप होईल । ऐसें तयासी बोलिले ॥
तो ब्राम्हाण तये वेळे । उठोनि गेला तेथोनि ॥११॥
त्या काळीं आनंदमूर्ती । बोलले ब्राम्हाण मंडळीप्रती ॥
महाप्रयाण त्वरित गती । आम्हां करणें प्राप्त असे ॥१२॥
तुम्ही सर्व करोनि स्नान । यावें नित्यकर्म सारोन ॥
आमुचें झालिया निर्याण । ब्रम्हानाळा शव न्यावें ॥१३॥
देहसंस्कारा लागोनी । वृंदावना सन्निधानीं ॥
त्वरें तेथें नेनोनी । सार्थक करावें यथोक्त ॥१४॥
ऐसे स्वामी वदतां तेथें । व्यग्र जाहले सर्व चित्तें ॥
ऐसे आज कां बोलते । झाले श्रेष्ठ गुरुभक्त ॥१५॥
कोणी होते वृद्ध तेथें । त्यांहीं पुसिलें श्रीमूर्तीतें ॥
आजि ऐसें करूनि दुश्चित । वार्ता वद्तां महाराज ॥१६॥
दु:शब्दानें आमुच्या जीवा । दु:ख वाटतें देवदेवा ॥
श्रीमूर्तीं गिरा वदले तेव्हा । विप्रमंडळी कारणें ॥१७॥
आताम जो येवोन ब्राम्हाण । करविलें पंचागश्रवण ॥
त्यासमयींच सर्वत्रांनीं । शब्द त्याचा परिशिला ॥१८॥
आज्ञा केली मजलागोन । बैकुंठ चतुर्दशी शुभदिन ॥
आजी करणें महाप्रयाण । उक्त असे म्हणौनी ॥१९॥
आज्ञा किमर्थ उल्लंघावी । अवज्ञा शद्वाची कां करावी ॥
याहून विशेष पदवी । काय असे पुढें हो ॥२०॥
जन्म आला अचुंबित । मरण पडलें सहज त्यांत ॥
आज अथवा वर्षशत । मरण दिवस सारखा ॥२१॥
[संमत श्लोक :--- अद्यवाद्वशतांतेवा मृत्युर्वै प्राणिनां ध्रुव: ॥
मृत्युर्जन्मवतां वीर देहेन सहजायते ॥१॥
मग बोलती द्विज समुदाव । ब्राम्हाण म्हणजे काय देव ॥
त्याच्या वचनीं धरून भाव । देह त्यागूं म्हणतसां ॥२२॥
मग बोलले महानुभाव । ब्राम्हाण नव्हे तो ब्रम्हादेव ॥
असत्य जरी घेवोनि यावें । शोधूनि तया या वेळां ॥२३॥
ऐकोन निघाले बहुत विप्र । शोधून पाहती सर्व क्षेत्र ॥
ब्राम्हाणाचा तिळमात्र । शोध न लागे तेधवां ॥२४॥
पुन्हा आले श्रीसन्निध । सांगती कोठें न लागे शोध ॥
आतां होता इतुक्यामध्यें । कोठें गेला नेणवे ॥२५॥
श्री बोलले कैचा द्विज । शोध - श्रमाचें नाहीं काज ॥
वैकुंठ चतुर्दशी आज । प्रत्यक्ष बोलला चतुर्मुख ॥२६॥
सवर्त्रांनीं श्रवण केलें । महा प्रयाणार्थ बोलिलें ॥
उत्तम ऐसें घडलें । उत्तर आमुचें तयासी ॥२७॥
तदनुसार करणें प्राप्त । कल्पूं नका दुसरा अर्थ ॥
नित्य कृत्य सारोनि त्वरित । पुनरपि यावें या स्थळीं ॥२८॥
ऐसें सांगोन आपले मठीं । आज्ञापिली एक गोष्टी ॥
उपहार उद्योग उठाउठी । करोन सिद्ध असावें ॥२९॥
आपण करोनिया स्नान । करीत बैसले श्रीपाद - पूजन ॥
पुराणिकही पुराण । सांगत बैसले समीप ॥३०॥
वैदिक बोलावून श्रेष्ठ । चालविला पवमान - पाठ ॥
नामकीर्तन बोभाट । तोही हरिदासें करिजेला ॥३१॥
आपण बहु सावधपणें । सर्व एकाग्र करिती श्रवण ॥
मुखें श्रीरामजयराम - स्मरण । घोष करिती बहु गजरें ॥३२॥
ऐसें समारंभीं असतां । ग्रामस्थ मंडळी त्वरितां ॥
येवोनी निकट पाचेतां । आज्ञापिलें तयातें ॥३३॥
सर्वही करा भजन - गजर । ऐसें ऐकोनी विप्रभार ॥
भजन घोष केला फार । उच्चस्वरें करोनी ॥३४॥
स्वामी बोलले एकवार । सर्वही अति उच्चस्वरें ॥
श्रीसीताकांत हीं अक्षरें । जय जय राम उच्चारा ॥३५॥
ऐसें ऐकोनि ते ब्राम्हाण । परम उच्चस्वरें करोन ॥
सीताकांत असें स्मरण । केली गर्जना बहुसाल ॥३६॥
आधींच आसन घालोन । पादुका पुढें ठेऊन ॥
आपण करीत भजन । बैसले होते सावध ॥३७॥
उच्चस्वरें श्रीराम जयराम । आपणही उच्चारोन नाम ॥
शरीर लोटलें पुरुषोत्तमें । श्रीपादुका वरुते ॥३८॥
सर्वत्नांचे चित्तीं भ्रांती । नमस्कारिती आनंदमूर्ती ॥
चांचपोन जंव पाहती । नि:प्राण झालें शरीर ॥३९॥
झाला तदा हाहा:कार । मिळाले बहुत नारीनर ॥
कन्या पुत्र मित्नगोत्र । परम आकांत करिजेला ॥४०॥
अंथरोन उर्णावस्त्र । शव निजविलें त्यावर ॥
पुढील साहित्य सत्वर । मंडळींनीं मेळविलें ॥४१॥
मिळोनिया विप्रमांदी । शव उचलोन घेतलें खांदीं ॥
ब्रम्हानाळींची मार्गशुद्धी । करोनिया चालिले ॥४२॥
मार्गीं करीत कीर्तन । वारंवार नामस्मरण ॥
ऐसें करीत वृंदावन । समीप गेले सर्वत्र ॥४३॥
वृंदावनाच्या सन्निधानीं । येतां ऐकला सर्वत्रांनीं ॥
आकाशामाजी मंजुळध्वनी । नाद श्रवणीं पडतसे ॥४४॥
सर्वही ऐकती निवांत । कैचा ध्वनी ऐकीं येत ॥
वृद्ध सुजाण होते त्यांत । त्यांनीं निश्चय मग केला ॥४५॥
वैकुंठवासी श्रीमूर्ती । जाहले आज निश्चिती ॥
येथील ध्वनी ऐकों येती । अन्यथा नोहे हें वचन ॥४६॥
वृंदावनींचा अदभुत । डोल झाला त्या समयातें ॥
हें पाहोनि धीमंत । चमत्कारिले निजमनीं ॥४७॥
म्हणती दुर्धर ख्याती । धन्य सुश्लोक आनंदमूर्ती ॥
अंतकाळींही महामती । सुकीर्ति करोनि पैं गेले ॥४८॥
स्वामींचा जो ज्येष्ठ सुत । नव्हता निर्याण समयातें ॥
धाकटा पुत्र गुणवंत । तिम्माप्पा होता त्या काळीं ॥४९॥
इंधनादि सर्व साहित्य । मिळवोनिया यथायुक्त ॥
मंत्राग्नी तिम्माप्पाचें हातें । देवविला द्विजवरीं ॥५०॥
इतुक्यांत जाहला सायंकाळ । परतोन जाणेस नाहीं वेळ ॥
त्रिरात्र तेथें द्विजमंडळ । वस्ती करोनि राहिलें ॥५१॥
मंडळींतील ब्राम्हाण श्रेष्ठ । त्यांनीं सहज काढिली गोष्ट ॥
आनंदमूर्तींनीं उत्कृष्ट । महोत्सव संतर्पण केलें ॥५२॥
यांचे मागें हे चालणें । बहुधा चित्तीं गमे कठिण ॥
इतुकेंत वृंदावनांतून । श्लोकध्वनी उमटला ॥५३॥
[संमत श्लोक गीता :--- ४ - ८ परित्राणाय साधूनां विनाशायच दृष्टकृतां ॥
धर्मसंस्थापनार्थाय संभवामि युगे युगे ॥१॥
टीका :--- साधूंचें परित्राण । दुष्कृतांचा विध्वंस करणें । धर्माचें प्रतिपालन ।
यास्तव अवतार युगायुगीं ]
ऐसा श्लोक ऐकतां । सर्व विस्मय पावले चित्ता ॥
म्हणती येथें श्लोक म्हणता । गोचर दृष्टी दिसेना ॥५५॥
वृंदावनामधुनी । निघती काय श्लोकध्वनी ॥
म्हणोनि मग निवांत हौनी । ऐकावयास इच्छिती ॥५६॥
पुन्हा साधुपरित्राण । श्लोक उठे वृंदावनांतून ॥
हें सर्वांनीं ऐकून । निश्चयार्थ मग केला ॥५७॥
आम्ही बोलिलों अन्नवस्त्र । उत्साह यात्रा अतिपवित्र ॥
आनंदमूर्तियें स्वतंत्र । चालविलें आजवरी ॥५८॥
येथून पुढें हें चालणें । वाटे आम्हां बहु कठिण ॥
त्याच गोष्टवरून पठण । श्लोक बोलले गुरुराज ॥५९॥
आमचा संशय वारावा । स्वकीर्तिध्वज उभारावा ॥
सांप्रदाय चालवावा । हें आवश्यक श्रीवर्या ॥६०॥
ऐसा निश्चय ठरवोनी । स्वस्थ राहिले आपुले स्थानीं ॥
इतुक्यांत बहें क्षेत्राहुनी । कृष्णाप्पाही पातले ॥६१॥
ते स्वामींचे ज्येष्ठ सुत । निर्याण समयीं घरीं नव्हते ॥
वृत्तांत परिसोन मार्गांत । दु:खित चित्तें धावले ॥६२॥
मी पातली हतभाग्य । श्रीनें केला माझा त्याग ॥
धरिला बैकुंठींचा मार्ग । आतां कोठें मी पाहूं ॥६३॥
निर्धार करोनी उपोषण । शुष्क होऊनि वेंचीन प्राण ॥
ऐसा पापी मी दुर्जन । कासया देह वागवूं ॥६४॥
ऐसा निश्चय करोन । कृष्णाप्पा परतीरा येऊन ॥
सन्मुख वृंदावन लक्षून । शोकाकुलित बैसले ॥६५॥
स्नान नसे मग कैसें पान । जाहले अहोरात्र तीन दिन ॥
कित्येक मंडळी जाबोन । नानापरी बोधिले ॥६६॥
तथापि कोणाची कांहीं । गोष्ट सर्वथा ऐकली नाहीं ॥
दर्शन दिधल्या वांचून पाही । प्राण ठेवीत नाहीं मी ॥६७॥
ऐसा तयाचा निश्चय । दिवस प्राप्त झाला तृतीय ॥
रक्षाविसर्जन । अस्थिसंचय । सर्वर्त्रांनीं संपादिलें ॥६८॥
आतां करावें वेदिका श्राद्ध । ऐसें बोलिले सकल बुध ॥
इतुक्यामाजि मूर्ती आनंद । प्रेतरूपी प्रगटले ॥६९॥
निर्याणसमयीं जैसें ध्यान । तैसेंच होऊनि निर्माण ॥
मुखीं तेज एक प्राण । मात्र नसे देहीं त्या ॥७०॥
वेदिकाश्राद्ध मग राहिलें । अदभुत हें दृष्टी पडलें ॥
कोठें कधींच नाहीं पाहिलें । विचैत्र ऐसें भूलोकीं ॥७१॥
वेदिका श्राद्ध आतां राहो । संस्कारीं घालावा हा देहो ॥
अदभुत केव्हडें पाहाहो । मागें पुढें ना श्रुतद्दष्ट ॥७२॥
केला सर्वांनीं निश्चय । स्वामींचा जो ज्येष्ठ तनय ॥
प्राप्त होतां निर्याणसमय । समीप भागीं नव्हता तो ॥७३॥
त्यासीं न होतां दर्शन । आपण केलें वैकुंठीं प्रयाण ॥
यास्तव निग्रह करोन । प्राण त्यागूं इच्छितसे ॥७४॥
त्यास द्यावया दर्शन । केलें कलेवर निर्माण ॥
एतदविषयीं भाव आन । नसे हें मना गमतसे ॥७५॥
श्रीकृष्णेचे पैलतीरीं । कृष्णानंद सदाचारी ॥
त्यास जाऊन झडकरी । श्रुत केला वृत्तांत ॥७६॥
आपणास दर्शन द्यावें या हेतू । प्रगटे श्री मूर्तिमंतू ॥
कलेवर प्राणरहितु । सजीव ऐसें प्रगटलें ॥७७॥
ऐसें ऐकोनि विपरीत । कृष्णानंद धावले त्वरित ॥
पोटीं धरोनिया शवातें । उकसाबुकशीं स्फुंदतसे ॥७८॥
स्वामींनीं मज कृतार्थ केलें । अघटित घडवोनि आणिलें ॥
मृत्युवश जें दग्ध जालें । पुन्हा निर्मिलें मजसाठीं ॥७९॥
त्याकाळींचा ध्यान श्लोक । कवीनें प्राकृत रचिला एक ॥
तोचि ग्रंथीं करोनी लेखक । श्रोत्यां श्रवणीं ऐकविला ॥८०॥
[ संमत श्लोक :--- प्रावर्णारुण वस्त्र भाळिं विलसे त्नीपुंडू जो रोखिला ॥
माळा कंठिसि उत्तरागं भुज तो जानूवरी ठेविला ॥
वक्षीं दक्षिणहस्त कुपटीं व्योमप्रभा ती असे ॥
ऐसा आनंददेह तृतीय दिवशीं कृष्णेक्षणार्थीं दिसे ॥१॥]
ऐसें ध्यान कलेवर । होतें तेथें तीन प्रहर ॥
पडिला सर्वांसी विचार । सार्थकाचा तेधवा ॥८१॥
पूर्वीं देह दहन केला । असतां पुन्हा गोचर झाला ॥
आतां अग्निसंस्कार याला । करावा कीं न करावा ॥८२॥
हीच पडली पंचाइती । कोणी नदींत लोटा म्हणती ॥
बहुतेक जनांचे चित्तीं । इंधनें आणोनि दग्ध करूं ॥८३॥
कितीएक मिळाली यात्रा । पाहवयालागीं त्या पवित्रा ॥
आश्चर्य वाटलें त्या सर्वत्रां । ऐसें कधींच न जाहलें ॥८४॥
इलक्यांत वर्तलें विपरीत । पडलें होतें जें कां प्रेत ॥
अकस्मात जाहलें गुप्त । काय कौतुक वर्णावें ॥८५॥
तृतीय दिवशींचें कृत्य । वेदिका श्राद्धादि समस्त ॥
करोनि पुढें यथोक्त । क्रिया कर्म चालविलें ॥८६॥
और्ध्वदेहिक सर्व कर्म । जेथींच्या तेथें दानधर्म ॥
यथाविधी वंशजोत्तम । पावविती सिद्धीतें ॥८७॥
केलें सुंदर संतर्पण । यथायोग्य हरिकीर्तन ॥
मिळाले सर्व इष्टजन । आनंदें सर्व बोलविले ॥८८॥
अगा हे चरित्र - भागीरथी । श्रवणीं जे कां सुस्नातं होती ॥
ते न पडती पुनरावृत्ती । संसार जनन मरणाच्या ॥८९॥
गोपाळात्मज्ज कवि - किंकर । संताचें रक्षोनिया द्वार ॥
प्रसाद इच्छित वारंवार । तिष्ठे पुढें कर जोडोनी ॥९०॥
आनंद - चरितामृत ग्रंथ । बापानंद - विरचित ॥
प्रेमळ संत परिसोत । पंचदशोध्याय गोड हा ॥९१॥
॥ श्रीरघुनाथापर्णमस्तु ॥