श्रीआनंद - चरितामृत

श्रीगोपाळात्मज विरचित श्रीआनंद वाचल्याने वेगळाच आनंद प्राप्त होतो.


श्रीआनंद - भूपाळी २

स्वप्रकाशा चिदानंदा आनंदघना । सिद्ध स्वानंदघना ॥
जडजिबा प्रकाशका श्रीगुरो रामनिधाना ॥१॥
जडजीव भ्रांत हौनी देह मी म्हणती । ऐशा अभ्यासें बुडती ॥
ही तव तुझी अनादि माया कांहीं न स्फुरे चिन्मूर्ती ॥२॥
जडां जिवां चालक तूझी नकळेचि युक्ती ॥
भक्ति भावें शरण रिघतां स्वयें प्रगटे चिन्मूर्ती ॥३॥
आतां इतुकें स्मरण देई ज्ञान - संपत्ती ॥
आपुली कृपा संपत्ती । तेणेंचि उद्धरूं म्हणे आनंदमूर्तीं ॥४॥