आरती १ ली.
सद्रगुरु म्हणे शिष्या परिसी तूं आतां । मी हा देह ऐशा सांडूनि अध्यास ।
तूं तव सश्चिदघन सुखैकरूप । देहत्रय नव्हसी जड साभस ।
जयदेव जयदेव सच्चिदगननीळा । जडां तारक एक तूंचि दयाळा ।
दु:खनाशक सुखदायक त्रैलोक्यपाळा । तूं तंव आम्हां दीनांलागी स्नेहाळा ज० ज० ॥१॥
स्थूल देह जाग्रदभिमानी विश्व । नेत्रस्थान भोग स्थूल पै द्दश्य ।
वैखरीवाचा रजोगुण विलास । तूं तंव याचा साक्षी स्वयंप्रकाश ॥२॥
लिंगदेह तैजस स्वप्न अवस्था । कंठस्थान भोग प्रविविक्त जाणता ।
मध्यमा वाचा नव्हसी निभ्रांता । सकळिक सत्वगुण तूंचि पै द्रष्टा ॥३॥
कारणदेह प्राज्ञ अवस्था सुषुप्ती । मीच ब्रम्ह ऐसें जाणे तो ज्ञप्ती ।
पश्यंतीवाचा आनंदभोग नव्हसी । सकळिक तमोगुण तूं तव चिन्मूर्ती ॥४॥
महाकारण देह तुर्य अवस्था । मीच ब्रम्हा ऐसी जाणे व्यवस्था ।
तूं तंव प्रत्यगात्मा नव्हसी निभ्रांता । निर्गुण निर्विकार तूं ब्रम्हा सत्या ॥५॥
ऐसें त्वंपदलक्षण निरसन केलें । तत्पद ईश्वरलक्षीं सहज निरसलें ।
असिपद पूर्ण ब्रम्हा उरलें । तेंचि सद्गुरुनाथें आम्हांसी केलें ॥ ज० ज० ॥६॥
आरती २ री.
ब्रम्हानंदा सुखदा जय ज्ञान - मूर्तीं । द्वंदातीतानंता चिद्व्योमस्फूर्तीं ।
त्रिपदी साक्षा लक्षा सहज संविति । एका नित्या श्रुती न वर्णवे कीर्ती ।
जयदेव जयदेव सद्गुरु श्रीरामा । सुखमूर्तीं आरती जय पूर्ण कामा । ज० ज०॥१॥
जय अमला जय अचला बुद्धि - प्रकाशा । भावातीता त्रिगुण - रहिता भवनाशा ।
स्मरणें रजतम मोडुनि तोडिशि भवपाशा । त्वन्मय आरति ह्रदयीं सद्गुरु शांतेशा ॥ ज० ज०॥२॥
शिवह्रदया रघुराया सुखरुप निजनामा । भक्त गाती नाचति डोलति निजप्रेमा ।
चिदघना परिपूर्ण सहज निजधामा । अद्वय आरति हृदयीं दासा जयरामा । ज० ज०॥३॥
आरती ३ री.
कृष्णाविष्णुरूप पूर्व - वाहिनी । वेदरूप वेदावती स्वामिनी ।
उभय संगमयुक्त वाहे अनुदिनीं । श्रीराम श्रीस्वामी आले ठाकोनी ।
जयदेव जयदेव जय कृष्णा रामा । आरती ओवाळूं तुज पुरुषोत्तमा । ज० ज०॥१॥
गुणातीत रूप अवतार स्वामी । संपविला स्वलीलें वसंत ग्रामीं ।
तेथुनिया गमन पुण्य संगमीं । ब्रम्हानाळ क्षेत्र कृष्णातिरिं भूमी । ज० ज० ॥२॥
महायोगिराज श्रीगुरूमूर्तीं । वरदहस्तें भक्तां तारी निजकीर्ती ।
जयजयकारें घोष जयराम करिती । त्याची चरण धूळ आनंदमूर्ती । ज० ज० ॥३॥
आरती ४ थी.
सत्कर्म साधनें हो । सदाचार संपन्न । अनुष्ठान पूर्ण योगी । मंत्र मंत्रार्थ ज्ञान । शोधिर्ली सर्व शास्त्रें ।
क्रियारूप आपण । श्रीराम - नाम शोभे । गुरुराज चिदघन । जयजया योगमूर्ती ।
घनानंद निजकीर्तीं । श्रीराम - नाम दीप्ती । परब्रम्हा विख्याती । जय जया योगमूर्ती ॥१॥
विरक्ती पूर्ण भक्ती । ज्ञान संपन्न मूर्ती । विध्युक्त साधनें हो । साध्य सुख उन्नती ।
साधनातीत साध्य । अखंड समाधि ख्याती । बाणला बोध अंगीं । जगन्मिथ्या प्रतीती ॥ज०॥२॥
जीवन्मुक्त योगिराजा । सत्य - प्रतिज्ञा वोजा । कृपाळु दिनबंधू । ऐसा नाहीं पै दुजा ।
शापानुग्रह पूर्ण । ईश्वर पाहे पहा सहजा । तारिलें सर्व जनां । महानंदांतुनी ज्या ।
जय जया योगमूर्ती ॥३॥
सत्यज्ञान सत्यवेधी । सत्यवचन गुणनिधी । परब्रम्हाप बोधी । चिदानंद संसिद्धी ।
आनंद भक्तजना । आप्तस्वामि दयाब्धी । जयजयकार घोष । करिती बाल वृद्ध ती ।
जयजया योगमूर्ती ॥४॥
श्रीराम - नाम वाचे । सदा आनंद पूर्ण । श्रीगुरुराम स्वामी । दयानिधी संपन्न ।
साधनातीत साध्य । घनानंद चिदधन । आनंद राम - पायीं । लोळे अखंड दीन ।
॥ जय जया योगमूर्ती । घनानंद निज कीर्ती ॥५॥