गवळणी Gavlan Collection

गवळण हा तमाशातील एक भाग आहे. पारंपरिक तमाशा सादरीकरणामध्ये गणानंतर गवळण सादर करण्याची प्रथा आहे. This is a collection of marathi gavlan.


गोपी म्हणती तूं कैसा रे कृपाळु

( चाल-साधुसंतां मागणे )


गोपी म्हणती तूं कैसा रे कृपाळु । करितो म्हणसी भक्तांचा प्रतिपाळु ।
तुजकारणे जीव जाला रे विकळु । युगासारिखा कठिण जातो वेळू ॥ध्रु०॥
आम्ही अवस्था भुललो तुझ्या योगे । दुःखी जालो रे तुझिया वियोगे ।
आम्हां सांडोनी जातोसी रागे रागे । सुख पाहतां नाढळे तुझ्या संगे ॥१॥
कृपा भाकितां भाकितां जाला शीण । अंतर गुंतले न कंठे तुजविण ।
कृपाकोमळ म्हणती विश्वजन । परि तूं पाहतां अंतरीचा कठिण ॥२॥
गोपी वचने बोलताती उदास । पोटी लागली भेटीची थोर आस ।
वाट पाहती चिंतनी रात्रंदिवस । देव पावला सरिसे निज दास ॥३॥