गणपती आरती संग्रह 4

गणपती आरती संग्रह


गणराया हे माझ्या ह्रदयाला...

गणराया हे माझ्या ह्रदयाला ॥ ओवाळु आरती तव पायां ॥ धृ ॥
दे मति निर्मळ तव गुण गायां ॥ अद्वय मज सुख द्याया ॥ १ ॥
मज कल्पित विधिवदर्चनवंदन ॥ मानूनि घे आजि सदया ॥ २ ॥
महामायात्मज विघ्न हराया ॥ शांता पदरजी मन दे रहाया ॥ ३ ॥