गणपती आरती संग्रह 5

गणपती आरती संग्रह


जयदेव जयदेव जय त्रिगुणात्...

जयदेव जयदेव जय त्रिगुणात्मक देवा

श्रीगुरुदत्तात्रय, विधि-हरि-हर, महादेवा ॥धृ०॥

जयजय श्रीमृगराजाचल पर्वतवासा

जय जय श्रीमहायोगी जन-मानस-हंसा

जय जय श्रीदशशतदल पंकजनिवासा

जय जय श्रीनिरंजन भुवनविलासा ॥जय० ॥१॥

दंड-कमंडलुमंडित रुद्राक्षमाळा

जटा-मुकुटधृतकुंडल पीतांबर पिवळा

कंथा त्रिशुळ, डमरु, भुजंगहार गळां

मुद्रा भस्म विलेपन त्रिपुंड्र गंधटिळा ॥जय० ॥२॥

भ्रमोनि दिग्मंडळ भूस्थळ अंतराळीं

येतसे अवधुत मूर्ती सायंकाळीं

होतसे जयजयकार गजर गदारोळी

नाचे भूतगणांसह शिव चंद्रमौळी ॥जय० ॥३॥

श्रीषड्‌गुणसंपन्न श्रीषड्‌भुजमूर्ती

भूवैकुंठ विराजे सिंहाद्रीवरती

नांदे भुक्‍ती, मुक्‍ती,धर्म, दया, शांती

विष्णुदास म्हणे श्रीगुरुपदिं विश्रांती ॥जय० ॥४॥