आखु-केतन: आशापूरक: आखुमहारथ: ।
इक्षुसागरमध्यस्थ: इक्षुभक्षणलालस: ॥७१॥
३७७) आखुकेतन---केतन म्हणजे पताका. ध्वज निशाण. आखु म्हणजे मूषक. उंदीर. मूषकचिन्ह असलेला ध्वज धारण करणारा.
३७८) आशापूरक---भक्तांच्या आशा पूर्ण करणारा. किंवा आशा म्हणजे दिशा. सर्व दिशांना पुरून उरणारा. सर्वव्यापी. चराचरातील समग्र जगताच्या सर्व प्रकारच्या इच्छा पूर्ण करण्याचे सामर्थ्य ज्याच्या ठिकाणी आहे त्यास ‘आशापूरक’ म्हणावे. असा एक गणेशमात्रच आहे. जो पूर्णब्रह्मस्वरूप आहे, सर्वथा आप्तकाम असल्याने त्याच्या ठिकाणी कसल्याच आशेचा संभव कधीही नसतोच म्हणूण तोच एक मात्र सर्वांच्या आशा पूर्ण करण्यास समर्थ असतो इतर कोणीही तसा नसतोच. हे विशेष रहस्य.
सूर्याचा पुत्र जो यमधर्म त्याला त्याच्या आईचा शाप लागून तो मोठया आपत्तीत सापडला. तिने यमाला ‘तू घाणेरडा दिसशील’ असा शाप दिला. त्यामुळे यम अतिशय कुरूप झाला, मलीन झाला. सूर्यनारायणाला त्याने यावर उश्शाप विचारला. सूर्य म्हणाला - ‘भगवंताने जे कार्य तुझ्यावर सोपविले आहे ते तुला करावेच लागणार आहे. परंतु आता तुला शापामुळे आलेले मालिन्य दूर व्हावे अशी तुझी जी आशा आहे, ती पूर्ण करण्याचे सामर्थ्य फक्त आशापूरक गणेशातच आहे. तू नामल क्षेत्री जा तेथे सुबुद्धिप्रत तीर्थकुंडात स्नान करून त्याची मनोभावे सेवा कर.’ यम तत्काळ तेथे गेला. पित्याच्या म्हणण्याप्रमाणे सर्व केले. त्याचा कुरूपपणा व व्याधी संपूर्ण नष्ट झाल्या.
दंडकारण्यातील नंदक गावात दुष्ट नावाचा एक कोळी राहत असे. तो गावात चोर्यामार्या, लोकांची हत्या करू लागला. त्याच्या त्रासाला कंटाळून लोकांनी संघशक्तीने त्याला गावाबाहेर काढले. तरीही त्याची दुष्कृत्ये थांबेनात. एकदा रस्त्याने मुद्गल ऋषी चालले असता त्याने त्यांच्यावरही खड्ग उगारले पण त्याचा हात एकदम लुळा पडला मुद्गलांनी त्याच्या अंगावरून प्रेमाने हात फिरवला. दुष्टाचा हात पूर्ववत् झाला. दुष्ट कोळी अवाक् झाला. हा कोणीतरी परमेश्वरी अवतार आहे असे जाणून आपला उद्धार करावयास त्याने मुद्गलांना विनविले. त्यांच्या सांगण्याप्रमाणे त्याने गणेशतीर्थात स्नान केले. यथासांग गणेशपूजा केली. ‘पुत्रा’ असे संबोधून ऋषींनी त्याच्या मस्तकावर हात ठेवला. तेथे जमिनीत एक वाळलेली काटकी पुरली व त्या काटकीला हिरवी पालवी फुटेपर्यंत पद्मासनात बसून ‘श्रीगणेशाय नम:’ या मंत्राची अनुष्ठाने करावयास सांगितलि. वर्षामागून वर्षे सरली. दुष्टाच्या अंगावर वारूळ तयार झाले. त्या फांदीला हिरवी पालवी फुटली. एकदा अचानक मुद्गल ऋषी तेथून जात असता वारुळातून ॐॐॐ असा नाद ऐकू आला. वारुळाची माती दूर करताच कृश झालेला दुष्ट नजरेस पडला पण आता त्याच्या दोन भुवयांमध्ये त्याला एक सोंड निर्माण झाली होती. मुद्गलांच्या पायी त्याने मस्तक ठेवले. मुद्गलांनी त्याचे भृशुंडी असे नामकरण केले. त्या ॐ या एकाक्षरी मंत्राची दीक्षा दिली. आता त्याला साक्षात् गणेशाचेच रूप प्राप्त झाले होते. भृशुंडीने नामलक्षेत्री गणेशमूर्तीची होमहवन करून प्रतिष्ठापना केली. जप-जाप्य. अनुष्ठाने केली. खूप वर्षांनी साक्षात् गणपतींनी त्याला दर्शन दिले. त्याने ‘आशापूरक’ असे म्हणत गणपतींच्या चरणी माथा टेकविला. मातापितादी पितरांना कुंभीपाक नरकातून सोडविण्याची त्याची आशाही गणेशाने पूर्ण केली. श्रीगणेशाने या तीर्थक्षेत्रीच भृशुंडींना ना-मल केले. असल केले.
आशापूरक-अमलाश्रम-नामलक्षेत्र अशी या तीर्थभूमीची नावे आहेत. महाराष्ट्रातील मराठवाडयात बीड शहरापासून सुमारे १० कि.मी. वर हे क्षेत्र आहे. कर्पूरा-बिंदुसुरा आणि नारदा या तीन नद्यांच्या संगमावर आशापूरक गणपतीचे दगडी बांधणीचे मंदिर आहे. मूर्ती साधारण सव्वा फूट रुंद व सव्वा दोन फूट उंचीची आहे. पेशव्यांनी या गणपतीला नवस केला होता.
३७९) आखुमहारथ---मूषक हाच ज्याचा महान् रथ आहे.
३८०) इक्षुसागरमध्यस्थ---इक्षु म्हणजे ऊस, ऊसरसाच्या सागरात राहणारा.
३८१) इक्षुभक्षणलालस---ऊस खाण्याची ज्याला अतिशय आवड आहे.
इक्षुचाप-अतिरेकश्री: इक्षुचापनिषेवित: ।
इन्द्रगोपसमानश्री: इन्द्रनीलसम-द्युति: ॥७२॥
३८२) इक्षुचापातिरेकश्री---इक्षुचाप (इक्षुधन्वा, मदन) मदनापेक्षाही ज्याचे सौंदर्य अधिक आहे.
३८३) इक्षुचापनिषेवित---कामदेव ज्याची सेवा करतो असा.
३८४) इन्द्रगोपसमानश्री---मृगाच्या पावसात वनात लालचुटुक मखमली कीटक दिसू लागतात त्या इंद्रगोप कीटकांप्रमाणे ज्याची कांती लालचुटुक आहे असा.
३८५) इन्द्रनीलसमद्युति---इन्द्रनीलमण्याप्रमाणे श्यामलकांती असणारा. मयूरेश्वर अवतारात श्रीगणेश नीलवर्णी आहे. (कामनाभेदाने भिन्न रंगरूपात श्रीगणेशाचे ध्यान असते. भिन्न भिन्न युगात अवतार घेऊन तो अरुण. श्याम वगैरे कान्ती धारण करतो.)
इन्दीवरदलश्याम: इन्दुमण्डलनिर्मल: ।
इध्मप्रिय: इडाभाग: इराधामा इन्दिराप्रिय: ॥७३॥
३८६) इन्दीवरदलश्याम---नीलकमलपत्राप्रमाणे जो श्यामवर्णाचा आहे.
३८७) इन्दुमण्डलनिर्मल---पूर्णचन्द्राप्रमाणे ज्याची निर्मल कांती आहे.
३८८) इध्मप्रिय---इध्म म्हणजे समिधा ज्याला प्रिय आहे असा.
३८९) इडाभाग---ऋत्विक् आणि यजमान रूपात यज्ञकर्मात भाग घेणारा. (इडा म्हणजे पृथ्वीची अधिष्ठात्री देवता).
३९०) इराधामा---इरा म्हणजे पृथ्वी. पृथ्वी हेच ज्याचे धाम म्हणजे निवासस्थान असणारा.
३९१) इन्दिराप्रिय---इन्दिरा म्हणजे लक्ष्मी. लक्ष्मीला प्रिय. पूजनीय असणारा.
इक्ष्वाकुविघ्न-विध्वंसी इतिकर्तव्यता-ईप्सित: ।
ईशानमौलि: ईशान: ईशानसुत: ईतिहा ॥७४॥
३९२) इक्ष्वाकुविघ्नविध्वंसी---राजा इक्ष्वाकूच्या विघ्नांचा नाश करणारा.
३९३) इतिकर्तव्यतेप्सित---इतिकर्तव्यता म्हणजे यज्ञकर्माच्या अंगभूत सामग्रीची अपेक्षा ठेवून यजमानाच्या कामना पूर्ण करणारा.
३९४) ईशानमौलि---नरेश, भूतेश आणि सुरेश आदी ईश्वरांचा शिरोमणी. ऐश्वर्ययोगी. किंवा सम्राट, भूपति, राजेरजवाडे यांना शिरोधार्य.
३९५) ईशान---स्वामी. देवतांनाही जीवन देणारा.
३९६) ईशानसुत---ईशान म्हणजे शंकर. शंकराचा सुत म्हणजे पुत्र.
३९७) ईतिहा---ईति म्हणजे उपद्रव. अतिवृष्टी. अनावृष्टी, उंदीर, टोळ, किडे, परचक्र व स्वसैन्यपीडा या उपद्रवांचा नाश करणारा.
ईषणात्रय-कल्पान्त: ईहामात्र-विवर्जित: ।
उपेन्द्र: उडुभुन्मौलि: उण्डेरक-बलिप्रिय: ॥७५॥
३९८) ईषणात्रयकल्पान्त---ईषणात्रय म्हणजे लोकैषणा (स्वर्गादि लोकेच्छा), पुत्रैषणा (स्त्रीपुत्रादिंबद्दल आसक्ती) व वित्तैषणा (द्रव्याची अभिलाषा). या ईषणात्रयाचा पूर्ण निरास करणारा.
३९९) ईहामात्रविवर्जित---ईहा म्हणजे इच्छा. ज्याने सर्व इच्छा-अपेक्षा सोडून दिलेल्या आहेत असा.
४००) उपेन्द्र---कश्यप-अदिती यांचे येथे अवतीर्ण महोत्कट विनायक. वामनरूप - बटुरूप.
४०१) उडुभृन्मौलि---उडु म्हणजे नक्षत्र. भृत् म्हणजे भरण भोषण करणारा राजा. उडुभृत् म्हणजे नक्षत्रांचा राजा अर्थात चंद्र. मौलि म्हणजे मस्तक. चन्द्रास मस्तकावर धारण करणारा.
४०२) उण्डेरकबलिप्रिय---उण्डेरक म्हणजे पिठाचा पिठाचा गोळा. उंडा. गोल गोल खाद्यपदार्थ. उदा. लाडू वगैरे मिष्टान्न ज्याला आवडतात. उंडेरकाचा बलि (नैवेद्य) ज्याला प्रिय आहे असा.