चतुर्विध-उपायमय: चतुर्वर्णाश्रमाश्रय: ।
चतुर्विध-वचोवृत्ति-परिवृत्ति-प्रवर्तक: ॥१३६॥
८५०) चतुर्विधोपायमय---साम-दाम-भेद-दण्ड या चार उपायांची मिळणार्या फलाचा साधक.
८५१) चतुर्वर्णाश्रमाश्रय---ब्राह्मण-क्षत्रिय-वैश्य-शूद्र हे चारही वर्ण आणि ब्रह्मचर्य-गार्हस्थ्य-वानप्रस्थ्य आणि संन्यास या चारही आश्रमांचा आश्रय असलेला म्हणजे यापैकी कोणीही याची उपासना करावी. शूद्रांना वेदाध्ययनाची बंदी होती. तशी गणेशोपासनेची बंदी कोणालाही नाही.
८५२) चतुर्विधवचोवृत्तिपरिवृत्तिप्रवर्तक---पश्यन्ती-मध्यमा-परा-वैखरी यांचा उद्भव आणि एकीतून दुसरीत होणार्या परिवर्तनाचा प्रवर्तक.
चतुर्थीपूजनप्रीत: चतुर्थीतिथिसम्भव: ।
पञ्चाक्षरात्मा पञ्चात्मा पञ्चास्य: पञ्चकृत्यकृत् ॥१३७॥
८५३) चतुर्थीपूजनप्रीत---चतुर्थीस पूजन केले असता संतुष्ट होणारा.
८५४) चतुर्थीतिथिसम्भव---चतुर्थी तिथीस प्रकट झालेला.
८५५) पञ्चाक्षरात्मा---नाद-बिन्दू-मकार-अकार व उकार ही प्रणावान्तस्थित पाच अक्षरे आहेत तत्स्वरूप.
८५६) पञ्चात्मा---ब्रह्या-विष्णू-महेश-ईश्वर व सदाशिव या पाच विग्रहाने युक्त.
८५७) पञ्चास्य---आस्य म्हणजे मुख. विस्तृत मुख असणारा. पाच मुखे असणारा. ब्रह्माण्डाचा कवळ (घास) घेण्यास समर्थ.
८५८) पञ्चकृत्यकृत्---निर्मिती-पालन-संहार-तिरोधान (पूर्ण लय) आणि अनुग्रह (कृपा) या पाच क्रिया करणारा.
पञ्चाधार: पञ्चवर्ण; पञ्चाक्षरपरायण: ।
पञ्चताल: पञ्चकर: पञ्चप्रणवभावित: ॥१३८॥
८५९) पञ्चाधार---पञ्च महाभूतांचा (पृथ्वी-आप-तेज-वायू-आकाश) आधार.
८६०) पञ्चवर्ण---कोटिसूर्याप्रमाणे तेजस्वी वर्ण असूनही सत्य-त्रेता-द्वापर व कली या चार युगात अनुक्रमे हेम-धवल-रक्त व धूम्रवर्णांचे विग्रह धारण करणारा. (हेमवर्ण: कृतयुगे त्रेतायां धवलच्छवि: । द्वापरे रक्तवर्ण: त्वं कलौ तु धूम्रवर्णक:॥)
८६१) पञ्चाक्षरपरायण---‘नम: शिवाय’ असा शिवपञ्चाक्षर मन्त्र जपणारा.
८६२) पञ्चताल--- आंगठा व मधले बोट यातील अंतराला ताल म्हणतात.
८६३) पञ्चकर---२४ अंगुळे = १ कर (१२ अंगुळे = १ वीत) १२० अंगुळांएवढी उंची असणारा. किंवा चतुर्भुजरून आणि शुंडारूप पाचवा कर असणारा. किंवा प्र-पंचाचा निर्माता किंवा वरील पंचरूपात नटणारा.
८६४) पञ्चप्रणवभावित---तार-वाग्भट-लज्जा-आभा व परा अशा पाच प्रणवांनी वाच्य असणारा.
पञ्चब्रह्ममयस्फूर्ति: पञ्चावरणवारित: ।
पञ्चभक्ष्यप्रिय: पञ्चबाण: पञ्चशिवात्मक: ॥१३९॥
८६५) पञ्चब्रह्ममयस्फूर्ति---सद्योजात-वामदेव-अघोर-तत्पुरुष व ईशान या पाच सगुण ब्रह्मस्वरूपी स्फूर्तीने युक्त.
८६६) पञ्चावरणवारित---अन्नमय-प्राणमय-मनोमय-विज्ञानमय-आनंदमय या पाच कोशांचे आवरण असलेला.
८६७) पञ्चभक्ष्यप्रिय---पंचखाद्य म्हणजे खसखस-खोबरं-खारिक-खडीसाखर आणि खवा या पाच पदार्थांचे मिश्रण ज्याला प्रिय आहे असा. किंवा लाडू-मोदक-पुरी-फेणी व वडे हे पाच पदार्थ ज्याला प्रिय आहेत असा.
८६८) पञ्चबाण---मदनस्वरूप. श्वेतकमल-अशोकपुष्प-आम्रमञ्जरी-नवमल्लिका आणि नीलकमल. हे कामदेवाचे पञ्चबाण आहेत.
८६९) पञ्चशिवात्मक---पंचशिव-बीजस्वरूप. कामेश्वरी उमा आणि कामेश्वर शिव यांची ऐश्वर्यरूप पाच बीजे, श्रीं ह्नीं क्लीं ग्लौं गं ही ती पाच बीजे.
षट्कोणपीठ: षट्चक्रधामा षड्ग्रन्थिभेदक: ।
षडध्व-ध्वान्त-विध्वंसी षड्-अड्गुल-महाह्नद: ॥१४०॥
८७०) षटकोणपीठ---षट्कोण चक्राने युक्त असे ज्याचे पूजापीठ (आसन) आहे.
८७१) षटचक्रधामा---मूलाधार-स्वाधिष्ठान्-मणिपूरक-अनाहत-विशुद्धी आणि आज्ञा या सहा चक्रांमध्ये ज्याचा वास आहे.
८७२) षडग्रन्थिभेदक---मूलाधार - मणिपूर आणि आज्ञा चक्रातील प्रत्येकी दोन अशा सहा ग्रंथींना मोकळे करून मुक्तिमार्ग प्रशस्त करणारा.
८७३) षडध्वध्वान्तविध्वंसी---पद-भुवन-वर्ण-तत्त्व-कला आणि मन्त्र यांना षडध्व म्हणतात. यांचे शोधन करून अज्ञानरूपी अडथळ्यांचा दोष दूर करणारा.
८७४) षड्ड्गुलमहाह्नद---ज्याचे नाभिकमळ सहा अंगुळे खोल असते तो. विशाल उदरामुळे खोल नाभी असणारा.