श्रीगणेशाची सहस्त्र नामे

श्रीगणेशाच्या सहस्त्रनामांचे मराठी अर्थ.


श्लोक १९६ ते २०३

निष्काम: तु जपन्‌ नित्यं भक्त्या विघ्नेशतत्पर: ।
योगसिद्धिं परां प्राप्य ज्ञानवैराग्यसंस्थित: ॥१९६॥
निरन्तर उदितानन्दे परमानन्द संविदि ।
विश्वोत्तीर्णे परे पारे पुनरावृत्ति-वर्जिते ॥१९७॥
लीन: वैनायके धाम्नि रमते नित्य-निर्वृत: ।
य: नामभि: यजेत्‌ एतै: अर्चयेत्‌ पूजयेत्‌ नर: ॥१९८॥
राजान: वश्यतां यान्ति रिपव: यान्ति दासताम्‌ ।
मन्त्रा: सिध्यन्ति सर्वे सुलभा: तस्य सिद्धय: ॥१९९॥
पण जो भक्तिभावाने विघ्नेश्वराचे ठायी लीन होऊन या स्तोत्राचा सदा जप करतो, तो श्रेष्ठ योगसिद्धी प्राप्त करून विश्वाहून विलक्षण व पुनर्जन्मरहित अशा अव्यक्ताहूनही पलीकडे असलेल्या विनायकांमध्ये लीन होऊन नित्य तृप्त होऊन स्वस्वरूपभूत तेजामध्ये निमम्न होतो. जो पुरुष या सहस्रनामाने हवन करतो व पूजन करतो त्याला राजे वश होतात व शत्रू त्याचे दास होतात. त्याचे सर्व मन्त्र सिद्ध होतात. त्याला सर्व सिद्धी सुलभ होतात. ॥१९६-१९९॥
मूलमन्त्रात्‌ अपि स्तोत्रम्‌ इदं प्रियतरं मम ।
नभस्ये मासि शुक्लायां चतुर्थ्यां मम जन्मनि ॥२००॥
दूर्वाभि: नामभि: पूजां तर्पणं विधिवत्‌ चरेत्‌ ।
अष्टद्रव्यै: विशेषेण जुहुयात्‌ भक्तिसंयुत: ॥२०१॥
तस्य ईप्सितानि सर्वाणि सिध्यन्ति अत्र न संशय: ।
इदं प्रजप्तं पठितं पाठितं श्रावितं श्रुतम्‌ ॥२०१॥
व्याकृतं चर्चितं ध्यातं विमृष्टं अभिनन्दितम्‌ ।
इह अमुत्र च सर्वेषां विश्वम्‌-ऐश्वर्यं-प्रदायकम्‌ ॥२०३॥
(श्रीगणेश सांगतात) - मूलमन्त्रापेक्षाही हे सहस्रनाम स्तोत्र मला अधिक प्रिय आहे. भाद्रपद शुद्ध चतुर्थीस, माझ्या जन्मदिनी दूर्वांसह सहस्रनाम अर्पण करून यथाविधी पूजा व तर्पण करावे. भक्तिभावाने विशेषत: आठ द्रव्यांनी हवन करावे म्हणजे या साधकाचे सर्व मनोरथ पूर्ण होतील यात शंका नाही. सहस्रनाम स्तोत्र नित्य जपावे. पठन-पाठन करावे, दुसर्‍यास ऐकवावे व आपण ऐकावे, व्याख्यान, विवरण करावे, चर्चा करावी, ध्यान करावे, विचार आणि अभिनंदन करावे. हे केले असता हे स्तोत्र इहलोकी सर्वांस सर्व ऐश्वर्य देणारे आहे. ॥२००-२०३॥