गणेश पूजा विधी 1

मंगलकार्य किंवा कोणत्याही चांगल्या कामाला सुरुवात करताना विघ्नहर्ता म्हणजेच श्रीगणपतीची पूजा व आराधना करण्याची प्रथा आपल्याकडे अनेक वर्षांपासून सुरू आहे. श्रीगणेश चतुर्थीच्या दिवशी प्रतिष्ठापना अशी करावी.


गणेश स्थापना - भाग ५


५६) महादक्षिणा

( गणपतीसमोर महादक्षिणा यथाशक्ती ठेवून त्यावर पाणी सोडावे. )
हिरण्यगर्भगर्भस्थं हेमबीजं विभावसोः ।
अनंतपुण्यफलदमतः शांतिं प्रयच्छ मे ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । महादक्षिणां समर्पयामि ।
५७) नीरांजन

( गणपतीला नीरांजनाने ओवाळावे.)
चंद्रादित्यौ च धरणिर्विद्युदग्निस्तथैव च ।
त्वमेव सर्वज्योतीषि आर्तिक्यं प्रतिगृह्यताम् ॥
कर्पूरगौरं करुणावतारं संसारसारं भुजगेंद्रहारम् ।
सदा वसन्तं हृदयारविंद भवं भवानीसहितं नमामि ।
श्री सिद्धिविनायकाय नमः । महानीरांजनदीपं समर्पयामि ।
५८) कापुरारती

( कापूर प्रदीप्त करून ओवाळावा.)
कर्पूरपूरेण मनोहरेण सुवर्णपात्रोदरसंस्थितेन ।
प्रदिप्तभासा सह संगतेन नीरांजन ते जगदीश कुर्वे ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । कर्पूरार्तिक्यदीपं समर्पयामि ।

( नमस्कार करावा )
५९) प्रदक्षिणा

( स्वतःभोवती उजवीकडून डावीकडे फिरावे. हात जोडावेत. )
यानि कानि च पापनि जन्मांतरकृतानि च ।
तानि तानि विनश्यन्ति प्रदक्षिण पदे पदे ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । प्रदक्षिणां समर्पयामि ।
६०) साष्टांग नमस्कार
नमः सर्वहितार्थाय जगदाधारहेतवे ।
सांष्टांगोऽयं प्रणामस्ते प्रयत्‍नेन मया कृतः ।
श्री सिद्धिविनायकाय नमः । नमस्कारान् समर्पयामि ।

( साष्टांग नमस्कार करावा )
६१) पुष्पांजली
नमस्ते विघ्नसंहर्त्रे नमस्ते ईप्सितप्रद ।
नमस्ते देवदेवेश नमस्ते गणनायक ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । मंत्रपुष्पं समर्पयामि ।

( गणपतीच्या चरणावर गंध, अक्षतांसह फुले घेऊन वाहावीत. )
६२) अर्ध्यप्रदान
पूजाफलाप्राप्त्यर्थ अर्घ्यप्रदानं करिष्ये ।

( असे म्हणून उजव्या हातावर काही नाणी, सुपारी, दोन दूर्वा, गंध, अक्षता व फुले घेऊन त्यावर पाणी घालावे. सर्व अर्घ्य खाली सोडावे. असे तीन वेळा करावे. )
नमस्ते देवदेवेश नमस्ते विघ्ननाशक ।
नमो भक्तानुकं देव गृहाणार्घ्यं नमोस्तु ते ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । इदमर्घ्य दत्तं न मम ।
गणेशाय नमस्तुभ्यं सर्वकामफलप्रद ।
वाञ्छितं देहि मे नित्यं गृहाणार्घ्यं नमोस्तु ते ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । इदमर्घ्यं दत्तं न मम ।
व्रतमुद्दिश्य देवेश गन्धपुष्पाक्षतैर्युतम् ।
अर्ध्य गृहाण देवेश मम सौख्यं विवर्धय ॥
श्री सिद्धिविनायकाय नमः । इदमर्घ्यं दत्तं न मम ।
६३) प्रार्थना
विनायक गणेशाय सर्वदेव नमस्कृत ।
पार्वतीप्रिय विघ्नेश मम विघ्नविनाशय ॥
नमो नमो विघ्नविनाशनाय नमो नमस्त्राहि कृपाकराय ।
नमोस्तुतऽभीष्टवरप्रदाय तस्मै गणेशाय नमो नमस्ते ॥
मंगलमूर्ति मोरया । श्री सिद्धिविनायकाय नमः ।
प्रार्थना समर्पयामि । यस्य स्मृत्या च नामोक्त्या तपः पूजाक्रियादिषु ।
न्यूनं संपूर्णतां याति सद्यो वंदे तमच्युतम् ॥
मंत्रहीनं क्रियाहीनं भक्तिहीनं सुरेश्वर ।
यत्पूजितं मया देव परिपूर्ण तदस्तु मे ॥
रूपं देही जयं देहि यशो देहि द्विषो जहि ।
पुत्रान्देहि धनं देहि सर्वकामांश्च देहि मे ॥

( नमस्कार करावा. )
अनेन यथाज्ञानेन यथामीलितोपचारद्रव्यैः ।
कृतपूजनेन श्री भगवान गणपतिः प्रीयताम् ।

( पूजासमाप्तीचे उदक सोडावे. )
ॐ तत्सत् ब्रह्मार्पणमस्तु ॥

नमस्कार करावा. नंतर आरत्या म्हणाव्या. मंत्रपुष्पांजलीनंतर गणेश गायत्री मंत्र म्हणावा.
ॐ एकदन्ताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि । तन्नो दन्ती प्रचोदयात् ॥
६४) तीर्थग्रहण

अभिषेकाचे व पंचामृतस्नानाचे तीर्थ एक पळीभर प्राशन करावे.
अकालमृत्युहरणं सर्वव्याधिविनाशनम् । देवपादोदकं तीर्थ जठरे धारयाम्यहम् ॥
६५) ब्राह्मणपूजा

गणेशचतुर्थीच्या दिवशी आपला गणपती आपणच बसवला असला तरीसुद्धा ब्राह्मणाच्या नावाने विडा , नारळ महादक्षिणा काढून ठेवावी. त्यावर गंध, अक्षता, फूल वाहावे, म्हणावे-
नमोऽस्त्वनन्ताय सहस्रमूर्तये सहस्रपादक्षिशिरोरुबाहवे ।
सहस्रनाम्ने पुरुषाय शाश्वते सहस्रकोटियुगधारणे नमः ॥

नंतर ते ब्राह्मणाला नेऊन द्यावे.
पूजा सांगण्यासाठी ब्राह्मण आला असल्यास त्याची सन्मानाने पूजा करावी. त्याच्या हातावर गंध, अक्षता, फूल, विडा व महादक्षिणा देऊन उदक सोडावे. त्याच्या मस्तकावर अक्षता अर्पण कराव्या व त्याचा आशीर्वाद घ्यावा. ब्राह्मण आपणाला आशीर्वाद देईल तो असा....दिर्घमायुः श्रेयः शांतिः पुष्टिस्तुष्टिश्वास्तु । शुभं भवतु ॥
---------------------------------------------------------------------------------------------------------------
अनंत चतुर्दशीचे दिवशी गणपती विसर्जनाच्या दिवशी खालीलप्रमाणे पूजा करावी.
उत्तरपूजा

शुचिर्भूत होऊन कपाळाला कुंकू लावावे. आसनावर बसावे. संकल्प करावा.
'श्री सिद्धिविनायकप्रीत्यर्थ पंचोपचारैः उत्तरपूजनं करिष्ये'

असे म्हणून पंचोपचारांनी पूजा करावी.
श्री सिद्धिविनायकाय नमः । विलेपनार्थे चंदनं समर्पयामि । ( गंध )
श्री सिद्धिविनायकाय नमः । पुष्पाणी समर्पयामि । ( फुले )
श्री सिद्धिविनायकाय नमः । धूपं समर्पयामि । ( उदबत्ती ओवाळावी.)
श्री सिद्धिविनायकाय नमः । दीपं समर्पयामि । ( नीरांजन ओवाळावी.)
श्री सिद्धिविनायकाय नमः । नैवेद्यं समर्पयामि । ( नैवेद्य दाखवावा. )
विडा, दक्षिणा ठेवावी. नारळ फोडावा. सर्व मंडळीच्या कल्याणासाठी मागणे करावे, म्हणावे-
यांतु देवगणाः सर्वे पुजामादाय पार्थिवीम् । इष्टकामप्रसिद्धयर्थ पुनरागमनाय च ॥

या मंत्राने मूर्तीवर 'मंगलमूर्ती मोरया' या नामघोषाने अक्षता वाहाव्या.
अनेन उत्तरपूजनेन श्री सिद्धिविनायकः प्रीयताम् ।

म्हणून उदक सोडावे. नंतर आरत्या म्हणाव्यात. सर्वांनी गणपतीवर गंधपुष्प वहावे. नमस्कार करावा. विसर्जनाच्या अक्षता घालाव्या. मूर्ती जरा सरकवावी. मूर्तीचे विसर्जन वाजतगाजत सर्वांनी मिळून करावे. गणपतीच्या जयजयकार करावा, म्हणावे-
मंगलमूर्ती मोरया । गणपती बाप्पा मोरया । पुढच्या वर्षी लवकर या ।