विधी: शुभ कार्य आणि शांतीसाठी हा मंत्र जप केला जातो.
मंत्र: 'हे त्रिलोका! मला शांतता लाभू दे. हे अंतरीक्षा! मला शांतता मिळू दे. हे पृथ्वी! मला शांतता लाभू दे. हे जला! मला शांतता लाभू दे. हे औषधीदेवा! मला शांती मिळू दे. हे विश्वदेवी! मला शांती मिळू दे. जी शांती परब्रम्हापासून सर्वांना मिळते ती मला मिळू दे.' हे सदा कार्यात मग्न असणार्या सूर्य कोटीप्रमाणे महातेजस्वी विशाल गणपती देवा माझे दु:ख निवारण कर. 'हे नारायणी! सर्व प्रकारची मंगल कामना करणारी त्रिनेत्रधारी मंगलदायिनी देवी! आपण सर्व पुरूषांना सिद्धी देणारी देवी आहात. मी आपल्या शरण आलो आहे. माझा नमस्कार आहे. तिन्ही देवांचे स्वामी ब्रम्हा, विष्णू आणि महेशाने सुरू केलेल्या सर्व कार्यात आम्हाला सिद्धी मिळू दे.'
संकल्प
हातात पाणी घेऊन म्हणा:- गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर श्री महागणपती देवाची प्रसन्नतेने पूजा करतो.
गणेश पूजा विधी 2
खाली दिलेली गणेश पूजा पूर्ण करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो. या विधीद्वारे सुलभ मराठीत गणेश प्रतिष्ठापना करू शकतात. पूजा करण्यासाठी विधी व मंत्रांचा भावार्थ मराठीत दिला आहे.