श्री गणेशाचे ध्यान
विधी: ध्यान म्हणून प्रणाम केला जातो.
ध्यान मंत्र: 'सृष्टीच्या प्रारंभकाळात प्रकट झालेले जे या जगाचे परमकारण आहे त्या गणेशाला चार भुजा आहेत, गजवदन असल्यामुळे त्यांचे दोन्ही कान सुपाच्या आकाराचे आहेत, त्यांना केवळ एकच दात आहे. तो लंबोदर असून त्यांचा रंग लाल आहे. त्यांला लाल रंगाचे वस्त्र, चंदन आणि फुले प्रिय आहेत. त्याच्या चार हातापैकी एका हातात पाश, दुसर्या हातात अंकुश, तिसर्या हातात वरद मुद्रा आणि चौथ्या हातात अभय मुद्राबरोबर मोदक आहे. त्याचे वाहन उंदीर आहे. जो व्यक्ती श्रीगणेशाची नित्य पूजा करतो त्याला योगीत्व प्राप्त होते.' हे गणराया! आपल्याला प्रणाम असो.
आवाहन व प्रतिष्ठापना
विधी: हातात अक्षता घेऊन खालील मंत्र म्हणून अक्षता अर्पण कराव्यात.
मंत्र: ॐ गणपती देवा! सिद्धी बुद्धीसहीत प्रतिष्ठीत हो.
गणेश पूजा विधी 2
खाली दिलेली गणेश पूजा पूर्ण करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो. या विधीद्वारे सुलभ मराठीत गणेश प्रतिष्ठापना करू शकतात. पूजा करण्यासाठी विधी व मंत्रांचा भावार्थ मराठीत दिला आहे.