गणेश पूजा विधी 2

खाली दिलेली गणेश पूजा पूर्ण करण्यासाठी पंधरा मिनिटे वेळ लागतो. या विधीद्वारे सुलभ मराठीत गणेश प्रतिष्ठापना करू शकतात. पूजा करण्यासाठी विधी व मंत्रांचा भावार्थ मराठीत दिला आहे.


ज्योती दर्शन

विधी: या विधीसाठी एक दिवा लावून हात धुवा.

मंत्र: 'हे देवा! कापसाच्या वातीने प्रज्वलित दीपक आपल्या सेवेसाठी अर्पण करत आहे. तो त्रैलोक्याचा अंधःकार दूर करणारा आहे. हे दीप ज्योतिर्मय देवा! माझ्या परमात्मा! मी आपणास हा दीपक अर्पण करत आहे. हे नाथा! आपण मला नरक यातनांपासून वाचवा. माझ्याकडून झालेल्या पापांबद्दल मला क्षमा करा.'

ॐ सिद्धी बुद्धीसहीत महागणपतीला नमस्कार करून दीप प्रज्वलित करा.
(वरील मंत्र बोलून दिव्याचा प्रकाश गणपतीकडे प्रज्वलित करा)
(नंतर हात धुऊन घ्या)