अष्टविनायक

अष्टविनायक ही महाराष्ट्रातील आठ मानाची व प्रतिष्ठेची गणपतीची देवळे आहेत. पश्चिम महाराष्ट्र व कोकणात असलेल्या ह्या देवळांना स्वतंत्र इतिहास आहे. या सर्व देवळांना पेशव्यांचा आश्रय असल्यामुळे त्यांना पेशवाईच्या काळात महत्त्व प्राप्त झाले. मुद्गल पुराणातही अष्टविनायकांचे वर्णन आढळते.


विदर्भातील आठ गणपती

या अष्टविनायकांप्रमाणेच विदर्भातदेखील गणपतीची आठ महत्त्वाची क्षेत्रे आहेत ती पुढीलप्रमाणे - ( येथील श्रीगणेशाच्या मंदिरांच्या संचाला ‘विदर्भातील अष्टविनायक’ म्हटले जाते.)

टेकडी गणपती, नागपूर
शमी विघ्नेश, आदासा (जिल्हा-नागपूर)
अष्टदशभुज, रामटेक (जिल्हा-नागपूर)
भृशुंड, मेंढा (जिल्हा-भंडारा)
सर्वतोभद्र, पवनी (जिल्हा-भंडारा)
सिद्धिविनायक, केळझर (जिल्हा-वर्धा)
चिंतामणी , कळंब (जिल्हा-यवतमाळ)
वरदविनायक, भद्रावती (जिल्हा-चंद्रपूर)