।। श्री समर्थ सद्गुरू गजानन महाराज की जय ।।
(चाल आरती भुवनसुंदराची )
ओवाळीतो स्वामीराया ।
माथा पदी ठेवूनीया ।।धृ।।
आवरी जगन्मोहिनीला ।
दावी चिन्मय स्वरूपाला ।।
देई सद्बुध्दी मजला ।
्रेमे तव यश गाण्याला ।।।।चाल।।
भक्तांकितां स्वामीराया, चरणी मी शरण ।।
करूनी भय हरण, दावी सुख सदन ।।
अमित मम दोष त्यागुनीयां ।
विनवितो दास तुला सदया ।। १ ।।
जन-पदमुक्ति-पदान्याया ।
स्थली या अवतरला राया ।।चाल।।
ही जड मुढ मनुज-काया ।
पदीं तव अर्पियली राया ।।चाल।।
हे दिग्वसन योगीराया,
नको मज जनन पुनरपि मरण, येत तुज शरण ।।
पुरवी ही आस संतराया ।
प्रार्थना हीच असे पाया ।। २ ।।
नेण्या अज्ञ-तमा विलया ।
अलासी ज्ञान रवी उदया ।।
करी तु ज्ञानी जनाराया ।
निरसुनी मोह - पटल माया ।। चाल ।।
गजानन संतराया असशी बळवंत ।
तसा धीमंत नको बघु अंत ।
विनवितो दास तुम्हा राया ।
नका त्या दूर करू सदया ।।३।।