श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


औदुंबर तळीं उभा नरहरी , भ...

औदुंबर तळीं उभा नरहरी, भक्‍तांची अंतरीं वाट पाहे ॥१॥

सुंदर तें ध्यान पाहातां तत्क्षण, वेडावलें मन नाचूं लागे ॥२॥

अंगांची ते कांति कोण वर्णी दीप्‍ति, कोटि चंद्र ज्योति नेत्रीं वसे ॥३॥

काषाय कौपीन छाटी प्रावरण, सच्चित्सुखघन ब्रह्म पूर्ण ॥४॥

दंडपात्र हातीं सुगंधी विभूति, हार कंबुकंठी शोभतसे ॥५॥

भक्‍तां साठीं ठेला अनेकीं एकला, गुणागुणकाला ’रङग’दिव्य ॥६॥