श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


बहुत दिनांचा उपवासी । आलो...

बहुत दिनांचा उपवासी । आलों आशें तुज पाशीं ॥१॥

देईं उच्छिष्ट भोजन । तेणें संतुष्ट हें मन ॥२॥

नसे पक्‍वान्नाची चाड । शेष भाजी पाला गोड ॥३॥

जेणें भंगे भवभय । ’रङग’ होई ही तन्मय ॥४॥