श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


मन बंधाचें कारण । मन नेई ...

मन बंधाचें कारण । मन नेई स्वर्गी जाण ॥१॥

मन मोक्षाचें जीवन । करीं अभ्यासें बा क्षीण ॥२॥

मन प्राण एकवटे । वृत्ति तिळ तिळ तूटे ॥३॥

होतां निःशेष संकल्प । ’रङग’ भेटे सच्चिद्रूप ॥४॥