श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


नाना ग्रंथ केले संतीं । प...

नाना ग्रंथ केले संतीं । परी एक अर्थ अंतीं ॥१॥

देव सत्य देह मिथ्या । जीव भोगी केल्या कृत्या ॥२॥

जेणें जैसें जैसें केलें । फळ तैसेंचि लाधलें ॥३॥

जीव परकार्यीं गेला । चिरंजीव तोचि झाला ॥४॥

’रंग’ पीडी जो पराला । पापी तोचि ओळखिला ॥५॥