श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


शरण आलों तुझ्या पायां । भ...

शरण आलों तुझ्या पायां । भटकोनी जगीं वायां ॥१॥

आतां धाडीं न परता । पाहूं नको रे पात्रता ॥२॥

पात्र पाहुनी ठेविसी । तुझी थोरवी ते कैसी ॥३॥

आम्हीं नालायक चोर । नांव ऐकुनी आलों थोर ॥४॥

नांवा सारिखें दे दान । पद दावीं रे निर्वाण ॥५॥

भक्ति पाहुनी पावसी । वाण्या पैल रे भाससी ॥६॥

त्यांत थोरपणा कैसा । बाजारींचा भाव ऐसा ॥७॥

नांव पतितपावन । श्रुति स्मृति गाती जाण ॥८॥

पतित तो देई काय । मागे बाळा काय माय ॥९॥

मायबाप आलों द्वारीं । कृपाभीक ’रंगा’ घालीं ॥१०॥