श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


देव पाहूं इच्छी मन । घरीं...

देव पाहूं इच्छी मन । घरीं संतांचे चरण ॥१॥

दूर ठेवीं अभिमान । पायीं अर्पी तनमन ॥२॥

सेवें देह झिजवावा । कृपाप्रसाद पावावा ॥३॥

अहो संत हे उदार । देण्या नांही लहान थोर ॥४॥

कुळ गोत न पाहती । आत्मस्वरुप करिती ॥५॥

जरी असे पुण्य गांठीं । ’रंग’ ऐशां पडे गांठीं ॥६॥