श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


स्थळ रितें संतां विण । ते...

स्थळ रितें संतां विण । तेंचि जाणावें स्मशान ॥१॥

तेथें राहूं नये कधीं । मूळ विचारीं रे आधीं ॥२॥

जेथें दत्त दत्त घोष । तेथें मना वाटे तोष ॥३॥

शास्त्रश्रवण सत्कथा । तेणें जावें मोक्षपंथा ॥४॥

नसे वाटाडया सद्‌गुरु । पावे कैंचा पैल पारु ॥५॥

’रंग’ संतपदीं लीन । मागे दास्यत्वाचें दान ॥६॥