श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


आम्हीं दत्ताचे नोकर । त्य...

आम्हीं दत्ताचे नोकर । त्याची खातसों भाकर ॥१॥

कोण काय आम्हां देई । कपाळीचें काय नेई ॥२॥

तुम्हीं ऐका हो श्रीमंत । नका होऊं मदोन्मत्त ॥३॥

धन जाईल जाईल । काळ जीवित खाईल ॥४॥

वाचे वदा दत्त दत्त । भावें सेवा साधुसंत ॥५॥

’रंग’ प्राण येतां कंठी । तेचि तारितील क्षितीं ॥६॥