श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


न मिळो तें अन्न वस्त्र प्...

न मिळो तें अन्न वस्त्र प्रावरण । परी दत्त जाण अंतरी ना ॥१॥

कवडीमोल धन होवो निःसंतान । न राहो निशान कोण रडे ॥२॥

हेंचि मागों देवा दे गा संतसेवा । अंतरीं केशवा ठाणें देईं ॥३॥

न पडो विसर अवधूत धूसर । सबाह्यअंतर तूंचि देवा ॥४॥

जग हें निःसार तूंचि एक सार । वृत्ति त्वदाकार होवो माझी ॥५॥

सदा मुखीं नाम आन नसो काम । मोह दाम चाम निरसीं वेगीं ॥६॥

’रंग’ तोक तुझें भव रोगें कूजे । कोण वैद्य दूजें तुज विण ॥७॥