श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


अनाथांच्या नाथा लाज तुझे ...

अनाथांच्या नाथा लाज तुझे हाता । पुनः पुनः माथा चरणीं ठेवी ॥१॥

न जाणे मी आन त्वद्यशर्णन । शास्त्र व्याकरण नेणों कधीं ॥२॥

न केलें श्रवण कोठोनी मनन । न तपश्चरण काय दावूं ॥३॥

नीरस हे बोल बोबडे बेताल । वाजवितों गाल तुज पुढें ॥४॥

तूंचि बापमाई गोड करुनी घेईं । पैलपार नेईं बूडों नेदी ॥५॥

न मागे मी आन वैभवसाधन । एक वेळ म्हणे ’रंग माझा’ ॥६॥