श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


सर्व सुखाचें आगर । देव दत...

सर्व सुखाचें आगर । देव दत्त दिगंबर ॥१॥

सहा हात षड्‌ विभूति । तीन शिरें सत्सुखज्योति ॥२॥

शील धेनु धर्म परी । श्वाननिगम जवळीं ॥३॥

योगभूमि तें श्‍मशान । बाह्य वायु गंगास्नान ॥४॥

कांखे झोळी माधुकरी । नित्य नवी भिक्षा बरी ॥५॥

वस्त्र नाहीं दिगंबर । परी बाप विश्वंभर ॥६॥

जगीं नटला नारायण । त्यासी कैसें आच्छादन ॥७॥

भक्तसंगें ’रंग’ धरी । देह विदेही नृहरि ॥८॥