श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


चला चला रेवातटीं । अनसूया...

चला चला रेवातटीं । अनसूया ती गोमटी ॥१॥

असे आश्रम पावन । होत नेत्र-संतर्पण ॥२॥

जरा मृत्यु दूर जाती । मोक्ष लागे बळें पाठीं ॥३॥

’रंग’ माया भ्रम नासे । पूर्ण ब्रह्म दत्त दिसे ॥४॥