श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


प्राणें विण देह जैसा । धर...

प्राणें विण देह जैसा । धर्में विण नर तैसा ॥१॥

चंद्रा विण कीं ते राती । दीप जैसा विण वाती ॥२॥

खानपान भय मैथुन । निद्रा पशूंत समान ॥३॥

कोण विशेष नृदेहीं । जरी सारासार नाहीं ॥४॥

धर्म हेंचि धन नरा । प्राणा पैल रक्षा करा ॥५॥

अंतीं तोचि हो सांगाती । ’रंग’ दारादि न राहती ॥६॥