श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


पोटा पुरती भाकरी । देगा न...

पोटा पुरती भाकरी । देगा न देगा बा हरी ॥१॥

लाज झांकाया लंगोटी । मिळो न मिळो जीर्ण ती ॥२॥

देह रोगें होवो क्षीण । परी मन पायीं लीन ॥३॥

जनीं वनीं वा स्मशानीं । देह पडो त्वत्स्मरणीं ॥४॥

दत्त दत्त ऐसें ध्यान । मन व्हावें हें उन्मन ॥५॥

सर्वां भूतीं ’रंग’ रुप । एक अभंग अनुप ॥६॥