श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


मोक्षाचें तें मूळ सत्संग ...

मोक्षाचें तें मूळ सत्संग विमळ । साधन सकळ सिद्ध होती ॥१॥

श्रवण मनन नित्य क्षण क्षण । दृढ ब्रह्मज्ञान होत जेणें ॥२॥

सदय ते संत उदार महंत । सारासार अंत जिहीं केला ॥३॥

दगड ब्राह्मणें बैसविला कोंडें । पूजिती रोकडे लोक सर्व ॥४॥

देहीं देव ठेला न कळे अज्ञाला । अनुग्रह केला ’रंग’ संतें ॥५॥