श्री दत्तात्रेयाचे अभंग

दत्तात्रेय पूर्ण अवतार असून, ब्रम्हा, विष्णू आणि महेश यांचे एकत्रीत रूप आहे.


सगुण निर्गुण दोन्हीं समरस...

सगुण निर्गुण दोन्हीं समरस झालें । पहातां निवाले नयन माझे ॥१॥

सच्चिदानदें मुखर्त्रितय धरिलें । गुणैश्वर्य झालें भुजषट्‌क ॥२॥

वेद मूक झाले नेति नेति गाती । श्वानरुपें वाहती पुढें मागें ॥३॥

शास्त्रें पक्षिरुपें कल्लोळ करिती । स्मशान वसति केली देवें ॥४॥

योगभूमि हेचि संत वाखाणिती । श्वान सुरभि पाहाती एक दृष्टि ॥५॥

ब्रह्मानंदे टाळी पिटीतां हो ’रंगे’ । भव भय भंगे काळ कांपे ॥६॥