संत मुक्ताबाईचे अभंग

मुक्ताबाई, संत ज्ञानेश्वरांची सर्वात धाकटी बहीण, हिचा पाया अध्यात्मिक होता. मुक्ताबाईने चांगदेवाचे गर्वहरण केले. मुक्ताबाईंनी आपल्या अध्यात्मिक सामर्थ्याने ज्ञानदेवांच्या पाठीवर मांडे भाजले होते.


मुक्तामुक्त कोडे पाहिलें ...

मुक्तामुक्त कोडे पाहिलें निवाडें । ब्रह्मांडा एवढें महत्तत्त्व ॥ १ ॥

निजतत्त्व आप अवघाचि पारपाक । एका रूपें दीपक लावियेला ॥ २ ॥

आदि मध्यनिज निर्गुण सहज । समाधि निजतेज आम्हा रामू ॥ ३ ॥

मुक्ताईचें धन आत्मराम गूण । देखिलें निधान ह्रदय घटीं ॥ ४ ॥