१६) झालों परदेशी एकटा येकला । परी तुझा अंकिला दास देवा ॥१॥
आतां बुझावण करणें तुम्हांसी । मी तो पायांपासी ठाव मागे ॥२॥
मोकलितां तुम्ही कोण पुसे मज । थोरीव सहज बुडालीसे ॥३॥
कर्ममेळा म्हणे आतां दंडवत । करा माझें हित तुम्ही दिवा ॥४॥
१७) तुमचा तो कळला भाव । माझा झाला पारखा ठाव ॥१॥
घेवोनी बैसलासी ठेवणें । माझे द्यावें मजकारणें ॥२॥
कायसा करिसी वादावाद । मुळींच खुण्टलासे भेद ॥३॥
कर्ममेळा म्हणे हरि । तुम्हां मज नाहीं उरी ॥४॥
१८) तुमच्या संगतीचें काय सुख आम्हां । तुम्हां मेघश्यामा न कळे कांहीं ॥१॥
हीनत्व आम्हांसी हीनत्व आम्हांसी । हीनत्व आम्हांसी देवराया ॥२॥
गोड कधी न निळेचि अन्नें । सदा लाजीरवाणें जगामध्यें ॥३॥
तुम्हांसी आनंद सुखाचा सोहळा । आमुचे कपाळा वोखटपण ॥४॥
चोखियाचा म्हणे कर्ममेळा देवा । हाचि आमुचा ठेवा भागाभाग ॥५॥
१९) न कळे तुमचें महिमान । सलगी पायीं जाण करितसे ॥१॥
कमाविलें जेणें तेंचि देई मज । येवढेंचि काज माझें आहे ॥२॥
जाणीवा शाहाणीव नको भरोवरी । नेणतें मी हरि पोसणें तुमचें ॥३॥
कर्ममेळा म्हणे जीवींची निजखूण । दाखवा चरण तुमचे देवा ॥४॥
२०) नाहीं मी मागत आणिकाचें कांहीं । आमुचें आम्हां देई पांडुरंगा ॥१॥
समर्थ म्हणोनी धरितों पदरा । वाउगा पसारा दाऊं नको ॥२॥
ब्रीद बांधिलें कासया चरणीं । तें सोडी चक्रपाणी पांडुरंगा ॥३॥
कर्ममेळा म्हणे तुज आमुची आण । नको निर्वाण करूं आतां ॥४॥