संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


याचि दुःखें झाला । विष सं...

याचि दुःखें झाला । विष संसार विठ्ठला ॥१॥

तुझीं न देखें न देखें । दृष्टी पाउले सन्मुखें ॥२॥

देहाचा या भार । मज झाला बहु फार ॥३॥

तुका म्हणे देवा । वाटे उपसर्ग जीवा ॥४॥