रिता नाहीं ठाव राहे देवावीण । रिघावया प्राण थार नसे ॥१॥
रिघालों पाठीसी ऋणाचिया भारें । रक्षियलें खरें पांडुरंगा ॥२॥
रिपु मज होते तरी सहोदर । रिता केलों फार नयो बोलूं ॥३॥
तुका म्हणे माझी चिंता पायांवरी । आपंगिलें करीं आपुलेंसें ॥४॥