संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


आतां सर्वभावें हा माझा नि...

आतां सर्वभावें हा माझा निर्धार । न करीं विचार आणिकांसीं ॥१॥

सर्वभावें नाम गाईन आवडी । सर्व माझी जोडी पाय तुझे ॥२॥

लोटांगण तुझ्या घालीन अंगणीं । पाहेन भरोनी डोळे मुख ॥३॥

निर्लज्ज होउनी नाचेन रंगणीं । येऊं नेदीं मनीं शंका कांहीं ॥४॥

अंकित अंकिला दास तुझा देवा । संकल्प हा जीवा तुका म्हणे ॥५॥