संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


तुझिया नामाची मजला आवडी ।...

तुझिया नामाची मजला आवडी । लागलिसे गोडी जीवाऐसी ॥१॥

हाचि माझा नेम वाहतसें आण । गेलियाही प्राण न सोडीं मीं ॥२॥

होणार तें हो कां माझिया प्रारब्धें । परि हा आनंद न सोडीं मी ॥३॥

जीव जीवा राहो आतां येचि घडी । प्रेमाचिये गोडी न विसंबे ॥४॥

तुका म्हणे माझ्या वडिलांची ठेवी । जतन हे जीवीं करीन मी ॥५॥