कामधाम आम्ही वाहिलें विठ्ठलीं । आवडी धरिली पायांसवें ॥१॥
आतां कोण पाहे माघारा फिरोनी । गेलों विसरोनी दहभाव ॥२॥
रिद्धि सिद्धि सुखा हाणितल्या लाता । प्राकृत तें आतां कोण पाहे ॥३॥
तुका म्हणे आम्ही विठोबाचे दास । करुनी ठेलों ग्रास ब्रम्हांडाचा ॥४॥