फटकळ आम्ही विष्णुदास जगीं । लागों नेदूं अंगीं पापपुण्य ॥१॥
निर्भय अंतरीं सदा सर्व काळ । घेतला सकळ भार माथां ॥२॥
बळिवंत ज्यानें रचिलें सकळ । आम्हा त्याचें बळ अंकितांसी ॥३॥
तुका म्हणे आम्ही देखतचि नाहीं । देवावीण कांहीं दुसरें तें ॥४॥