करुनि चिंतन उच्चारीन नाम । अखंडित प्रेम सर्व काळ ॥१॥
हेंचि विष्णूचिया दासांसी भूषण । कांपे तया भेणें कळिकाळ ॥२॥
आशा भय द्वेष लज्जा अहंकार । ऐसियांसी दूर सांडियेलें ॥३॥
तुका ह्मणे ऐसें समर्थाचें बळ । तेणें हें सकळ गोड झालें ॥४॥