संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


संकल्पिलें देहें । तुज मज...

संकल्पिलें देहें । तुज मज जंव पाहें ॥१॥

समर्पिलें पूगीफळ । रंगीं सुरंग तांबूल ॥२॥

रंगा रंग मेळविला । चित्त वित्त गा विठ्ठला ॥३॥

तुका म्हणे नाम । वाचा वदे सर्वोत्तम ॥४॥