संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


ज्याचे ठायीं तुम्हा असे ब...

ज्याचे ठायीं तुम्हा असे बहु प्रीत । तेंचि अखंडित करुं आम्ही ॥१॥

जेणें तुज रुचे आवडी त्या रसा । तेंचि हृषीकेशा करुं आम्ही ॥२॥

वेळोवेळां तुम्हा जयाचा आठव । तैसा आविर्भाव करुं आम्ही ॥३॥

जयाचिये ठायीं तुम्हासी आवडी । तैसी आतां जोडी करुं आम्ही ॥४॥

तुका म्हणे तुम्ही उदारचि असा । आम्ही तों सहसा न पालटूं ॥५॥