संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


पाहोन अधिकार । तैसें बोला...

पाहोन अधिकार । तैसें बोलावें उत्तर ॥१॥

काय वाउगी घसघस । आम्ही विठोबाचे दास ॥२॥

आम्ही जाणों एका देवा । जैसी तैसी करुं सेवा ॥३॥

तुका म्हणे भावें । माझें पुढें पडेल ठावें ॥४॥