संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


आतां करुं नेम । धरुं संतस...

आतां करुं नेम । धरुं संतसमागम ॥१॥

हेचि माझी उपासना । लागों संतांच्या चरणा ॥२॥

हाचि माझा धर्म । गाऊं विठाबाचें नाम ॥३॥

होउनि भिकारी । पंढरीचे वारकरी ॥४॥

तुका म्हणे देवा । हेचि माझी भोळी सेवा ॥५॥