ऐसें माझे मनीं वाटे नारायणा । घालावी चरणा बळें मिठी ॥१॥
कैसें तें सुंदर देखेन रुपडें । आवडीच्या कोडें आंलिंगीन ॥२॥
नाहीं पूर्वपुण्य मज पामरासी । म्हणोनी पायांसी अंतरलों ॥३॥
अलभ्य तो लाभ संचिता वेगळा । विनवी गोपाळा दास तुका ॥४॥