संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


नेत्रीं पाहुनियां ध्यान ।...

नेत्रीं पाहुनियां ध्यान । समाधान जीवाचें ॥१॥

भाळीं लाउनियां बुका । जगव्यापका पूजिलें ॥२॥

गळां घालुनियां माळ । पायीं भाळ ठेविलें ॥३॥

तुका म्हणे प्रेमभरें । नमस्कार घातला ॥४॥