येईं गा विठ्ठला येईं गा विठ्ठला । प्राण हा फुटला आळवितां ॥१॥
पडियेलों आतां थोर चिंतावनीं । उशीर कां अजुनी लावियेला ॥२॥
काय तुज नाहीं लौकिकाची शंका । आपुल्या बाळका मोकलितां ॥३॥
तुका ह्मणे बहु खंती वाटे जीवा । धरियेलें देवा दुरी दिसे ॥४॥