नाहीं मज सुख नलगे हा मान । न राहे हें जन काय करुं ॥१॥
देह उपचार पोळतसे अंग । विषतुल्य चांग मिष्टान्न तें ॥२॥
नाइकावी स्तुति वानिती थोरींव । होता माझा जीव कासावीस ॥३॥
तूझे पाय पावें ऐसी सांग कळा । नको मृगजळा गोवूं मज ॥४॥