संत तुकाराम अभंग - संग्रह १

संत तुकाराम गाथेत समाविष्ट न केलेले अप्रसिद्ध अभंग.


सलगी केली तोंड पिटी । आम्...

सलगी केली तोंड पिटी । आम्ही लडिवाळ धाकुटी ॥१॥

बोलूं नये तेंचि बोलें । देवा पाहिजे पाहिलें ॥२॥

अवघ्यांमध्यें एकचि बेडें । माय खेळवी त्यासी कोडें ॥३॥

तुका म्हणे मायबाप । आम्हावरी करीं कृपा ॥४॥